रेशनकार्ड धारकांनो, ‘या’ 19 जिल्ह्यात मोठे गिफ्ट मिळणार; उद्यापासून वाटप सुरू! तुमचा जिल्हा पहा Ration Card Holders List

ब्रेकिंग न्यूज! यंदा दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ मिळणार नाही. शासनाने १९ जिल्ह्यांमधील शिधापत्रिकाधारकांसाठी गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे, पहा.

रेशनकार्ड धारकांनो, या 19 जिल्ह्यात मोठे गिफ्ट मिळणार; उद्यापासून वाटप सुरू! तुमचा जिल्हा पहा Ration Card Holders List : राज्यातील शिधापत्रिकाधारकांना या वर्षीच्या दिवाळीत “आनंदाचा शिधा” (Anandacha Shidha) मिळणार नाही. यासोबतच पुरवठा विभागाने यंदा राज्यातील १९ जिल्ह्यांमधून शिधापत्रिकाधारकांना गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय मागील हंगामातील ज्वारीच्या जादा खरेदीमुळे आणि तिचा साठा सार्वजनिक वितरण व्यवस्थेत (PDS) वापरण्यासाठी घेण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

यंदा ‘आनंदाचा शिधा’ रद्द

मागील तीन वर्षांपासून सण-उत्सवाच्या काळात शासनाकडून “आनंदाचा शिधा” म्हणून अतिरिक्त वस्तूंचे वाटप केले जात होते. मात्र, या वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तो रद्द करण्यात आला आहे.

महागाई भत्त्यात मोठी वाढ निश्चित! तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा; DA Hike Latest News 2025
महागाई भत्त्यात मोठी वाढ निश्चित! तुमचा पगार किती वाढणार? येथे पहा DA Hike Latest News 2025

धान्याच्या वाटपात मोठा बदल

पुरवठा विभागाने १९ जिल्ह्यांमध्ये गहू आणि ज्वारी समान प्रमाणात वाटप करण्याचे आदेश दिले आहेत.

नवीन धान्याचे प्रमाण (अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजना):

योजनापूर्वीचे धान्य प्रमाणनवीन धान्य प्रमाण (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
अंत्योदय योजना (प्रति कुटुंब)१५ किलो गहू आणि २० किलो तांदूळ७.५ किलो गहू, ७.५ किलो ज्वारी आणि २० किलो तांदूळ
प्राधान्य कुटुंब योजना (प्रति व्यक्ती)२ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ१ किलो गहू, १ किलो ज्वारी आणि ३ किलो तांदूळ

स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत या नवीन प्रमाणानुसार धान्याचे वितरण सुरू झाले आहे.

पिकविमा बँक खात्यावर जमा झाला; लगेच यादीत नाव चेक करा Crop Insurance Status Check
पिकविमा बँक खात्यावर जमा झाला; लगेच यादीत नाव चेक करा Crop Insurance Status Check

या १९ जिल्ह्यांना मिळणार ज्वारी

ज्वारीचे वाटप सुरू झालेल्या महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यांची यादी खालीलप्रमाणे आहे. या जिल्ह्यांमधील लाभार्थ्यांना गव्हाऐवजी ज्वारी मिळणार आहे.

  1. हिंगोली
  2. बुलढाणा
  3. अकोला
  4. जळगाव
  5. नांदेड
  6. परभणी
  7. बीड
  8. धाराशिव (उस्मानाबाद)
  9. अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर)
  10. लातूर
  11. सोलापूर
  12. पुणे
  13. सातारा
  14. सांगली
  15. वर्धा
  16. नागपूर
  17. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
  18. नाशिक
  19. नंदुरबार

वाटप कधीपर्यंत सुरू राहणार?

जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांनी माहिती दिली की, २०२४-२५ या विपणन हंगामात राज्यात ज्वारीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले होते. आधारभूत किमतीवर मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी झाल्याने, या अतिरिक्त साठ्याचा उपयोग सार्वजनिक वितरण व्यवस्थेत करण्यात येणार आहे.

  • वाटपाचा कालावधी: ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात हे वाटप होणार असून, काही जिल्ह्यांमध्ये डिसेंबरपर्यंत ते सुरू राहू शकते.

हा बदल शासनाने ज्वारीच्या अतिरिक्त साठ्याचे नियोजन करण्यासाठी केला आहे.

After GST Activa and Jupiter Price Drop
जीएसटीत (GST) बदलानंतर अ‍ॅक्टिवा, ज्युपिटर झाली खूपच स्वस्त! नवीन किमत यादी पहा After GST Activa and Jupiter Price Drop

Leave a Comment