8th Pay Commission: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या महिला सक्षमीकरण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी (₹१,५००) वितरित करण्याच्या प्रक्रियेस कालपासून (१० ऑक्टोबर २०२५) सुरुवात झाली आहे.
8th Pay Commission
यामुळे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात हा मासिक सन्मान निधी जमा होईल.
ई-केवायसी (E-KYC) साठी महत्त्वाची सूचना
योजनेचा लाभ पुढील महिन्यांपासून अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी सरकारने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
- सप्टेंबरसाठी शिथिलता: सध्या सप्टेंबर महिन्याचा हप्ता वितरित होत असताना e-KYC ची अट शिथिल आहे. त्यामुळे ज्या महिलांनी KYC केले नाही, त्यांनाही हा हप्ता मिळेल.
- अंतिम मुदत: सरकारने सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन महिन्यांच्या आत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची विनंती केली आहे. पुढील महिन्यांपासून लाभ अखंडित ठेवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
- E-KYC पोर्टल: योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर ladakibahin.maharashtra.gov.in येथे ई-केवायसी सुविधा उपलब्ध आहे.
लाभार्थ्यांनी लवकरत लवकर अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.
तुमच्या खात्यात सप्टेंबरचा ₹१,५०० चा हप्ता जमा झाला असल्यास, कमेंट करून नक्की सांगा!