माणसाचे भविष्य काय असेल, याबद्दल जगभरात नेहमीच उत्सुकता राहिली आहे. भविष्य वर्तवणाऱ्यांमध्ये नास्त्रेदमस आणि ‘बाल्कनची नास्त्रेदमस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा यांचे नाव अग्रस्थानी आहे. बुल्गारियाच्या या रहस्यवादी महिलेच्या अनेक भविष्यवाण्या आजपर्यंत खऱ्या ठरल्या आहेत. बाबा वेंगा यांनी आजपासून ६३ वर्षांनंतर मानवांमध्ये एका विषाणूच्या संसर्गाबद्दल धडकी भरवणारं भाकीत केले होते.
२०८८ मध्ये वेगाने वृद्धत्व आणणारा विषाणू
बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, आजपासून ६३ वर्षांनी म्हणजेच २०८८ मध्ये, आपल्याला माहित नसलेला एक भयानक विषाणू पृथ्वीवर पसरेल. बाबा वेंगांच्यानुसार, या विषाणूने संक्रमित झालेली व्यक्ती लवकर वृद्ध होईल. याचा अर्थ असा की, मानवी आयुष्यमान हे वेगाने कमी होईल आणि कमी वयातच व्यक्तीचा मृत्यू होईल. बाबा वेंगाच्या वृद्धत्वाबद्दलची भाकितं आजपासून सहा दशकांनंतरच्या असल्या तरी, आजच्या बदलत्या हवामान, प्रयोगशाळेत तयार केलेले विषाणू आणि जैविक युद्ध पाहता, ही बाब गंभीर चिंतेचा विषय ठरू शकते.
कोण आहेत बाबा वेंगा?
बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये बल्गेरियात झाला आणि त्यांचे खरे नाव व्हँजेलिया पांडेवा दिमित्रोवा होते. अगदी लहान वयातच एका आजारामुळे त्यांची दृष्टी गेली; परंतु त्यांना लाभलेल्या भविष्य पाहण्याच्या अभूतपूर्व क्षमतेमुळे त्या जगभर प्रसिद्ध झाल्या. त्या ३० वर्षांच्या होण्यापूर्वीच त्यांच्या भाकितांसाठी आणि उपचार शक्तींसाठी त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. केवळ सामान्य लोकच नव्हे, तर बल्गेरियाचे राजा बोरिस तिसरे आणि सोव्हिएत नेते लिओनिड ब्रेझनेव्ह सारख्या दिग्गजांनीही त्यांचा सल्ला घेतला होता.
खऱ्या ठरलेल्या काही भविष्यवाण्या
२९ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले असले तरी, त्यांच्या हयातीत त्यांनी केलेली भाकिते अजूनही खरी ठरत आहेत. बाबा वेंगांच्या ज्या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या, त्यात ९/११ चा हल्ला, राजकुमारी डायनाचा मृत्यू, बराक ओबामा यांची अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवड आणि भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या यांचा समावेश आहे.