Gold Price Today: सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ पाहायला मिळत होती, ज्यामुळे सोन्याने दररोज नवे उच्चांक गाठले होते. मात्र, दसऱ्यानंतर सोन्याच्या दराला ब्रेक लागला आहे. दिवाळी (लक्ष्मीपूजन) अगोदर सोनं स्वस्त होतंय की काय? असा प्रश्न सध्या ग्राहकांना पडला आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, शुक्रवारी दिल्लीत सोन्याचा भाव चांगलाच घसरला.
नफा वसुली आणि डॉलरमध्ये थोडीशी सुधारणा झाल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला. यामुळे सोन्याच्या किमतीतील पाच दिवसांच्या विक्रमी तेजीचा शेवट झाला.
आजचे (४ ऑक्टोबर २०२५) सोन्या-चांदीचे दर
४ ऑक्टोबर २०२५ रोजी सोन्या-चांदीचे दर खालीलप्रमाणे आहेत:
कॅरेट | वजन | दर (₹) |
२४ कॅरेट सोने | प्रति १० ग्रॅम | ₹ १,१६,९५४ |
२३ कॅरेट सोने | प्रति १० ग्रॅम | ₹ १,१६,४८६ |
२२ कॅरेट सोने | प्रति १० ग्रॅम | ₹ १,०७,१३० |
१८ कॅरेट सोने | प्रति १० ग्रॅम | ₹ ८७,६१३ |
१४ कॅरेट सोने | प्रति १० ग्रॅम | ₹ ६८,४१८ |
चांदी ९९९ | प्रति १ किलोग्रॅम | ₹ १,४५,६१० |
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ₹५०० रुपयांनी घसरून ₹१,१८,८३० वर आला आहे, ज्यामुळे दरवाढीच्या विक्रमी तेजीला ब्रेक लागला आहे.
मुंबईतील ४ ऑक्टोबरचे दर
मुंबईत २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹११,९४० (१० ग्रॅमसाठी ₹१,१९,४००) आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹१०,९४५ आहे आणि १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम ₹८,९५५ आहे. हे दर हॉलमार्क्ड ज्वेलरीसाठी असून मेकिंग चार्जेस वेगळे असतात.
सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे मुख्य घटक
सोन्याच्या किमती आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती (MCX इंडेक्स), डॉलरची मजबुती, चलन विनिमय दर, आयात शुल्क (१२.५%), GST (३%), विवाह हंगाम आणि जागतिक घटना (जसे युद्ध किंवा महागाई) यासारख्या घटकांवर अवलंबून असतात. मुंबईत स्थानिक मागणीमुळे किमती थोड्या जास्त असू शकतात.
तुम्हाला वाटते, लक्ष्मीपूजनापर्यंत सोन्याचे दर आणखी स्वस्त होतील की पुन्हा वाढतील?